*नगरसेवक समद खान यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी बेकायदेशीर – 2500 ते 3000 सह्याच निवेदन*

0
818
Google search engine
Google search engine

प्रतिनिधि – उमेर सय्यद /अहमदनगर –

अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक समद खान यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी काही लोकांकडून करण्यात आली आहे तसे निवेदन देखील देण्यात आले आहे मात्र वास्तविक पाहता नगरसेवक समद खान हे एका गुण्ह्यात गेल्या 2 वर्षापासून अट्केत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्याचे निवेदन म्हणजे राजकीय द्वेष असल्याने काही लोकानी केलेली ही मागणी बेकायदेशीर असल्याचे सांगत मुकुंदनगर वासीयानी याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख यांना निवेदन दिले आहे ! अहमदनगर महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुक अवघ्या काही महीन्यावर आली आहे त्यामुळे आत्ता पासुनच प्रत्येकाने या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्यामुळे मुकुंदनगर मध्ये राजकीय चडाओड सुरू असल्याने समद खान यांच्यावर राजकीय द्वेषा पोटी सर्व कारवाई करण्याचे निवेदन देण्यात येत असल्याने करण्यात आलेली मागणी ही बेकायदेशीर असल्याच निवेदन 2000 ते 3000 हजार नागरिकांनी पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांना दिले आहे