ग्रामीण भागातील खेळाडूमुळे सुद्धा जिल्ह्याचा नावलौकिक :- माजी आमदार श्री दीपक आत्राम

0
1430

एटापल्ली :- बालपणातच पालकांनी मुलांच्या आवडी -निवडी ओळखून त्यांना चालना दिल्यास शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही प्रतिभावंत खिलाडीवृत्त असलेले पिढी घडविता येते यात पालक , शिक्षक आणि प्रशिक्षकाची भूमिका महत्वाची असते. ग्रामीण भागातील खेळाडूमंध्ये शहरी भागातील खेळाडूप्रमाणे क्रीडाविषयी अधिक पकड आणि जिद्द व चिकाटी असतात त्यामुळे या जिल्ह्याचा नावलौकिक ग्रामीण भागातील खेळाडूमुळे सुद्धा होत असल्याचा प्रतिपादन आविसचे नेते आणि माजी आमदार श्री दीपक आत्राम यांनी केले.
एटापल्ली तालुक्यातील उडेरा या गावात जय संघर्ष क्रिकेट मंडळाच्या वतीने आयोजित टेनिस बाल क्रिकेट सामन्यांचा उदघाटन प्रसंगी क्रीडा स्पर्धेचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.
या टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे अध्यक्षस्थान आविसचे युवा नेते आणि जि. प.उपाध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांनी भूषविले. सह उदघाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्या सारिका प्रविण आईलवार तर प्रमुख अतिथि म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य कारुजी रापंजी, आविस तालुका अध्यक्ष नंदू मट्टामी, सिरोंचा आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, पंचायत समिती उपसभापती नितेश नरोटे,पंचायत समिती सदस्या संगीता दुर्वा, माजी प.स.सदस्य मंगेश हलामी,अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रमेश वैरागडे, आविस सल्लागार रवी सल्लम, पेंटीपाका ग्रा.प.उपसरपंच कुम्मरी सडवली, बुर्गी ग्रा.प.उपसरपंच रामा तलांडे, पोलीस पाटील गोंगुलु गावडे,उपसरपंच अशोक हलामी, ताराबाई मट्टामी, अजय गावडे, गणेश दासरवार, श्रीकांत चिप्पावार, प्रज्वल नागूलवार, शेख कय्युम पठाण, हरीश पदा सह उडेरा, गेदा, पंदेवाही आणि तोडसाचे आविसचे सर्व पदाधिकारी आणि गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्तित होते.
यावेळी जि. प.उपाध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उडेरा या गावाला विकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची आश्वासन दिले.
या टेनिस बाल क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार एकवीस हजार रु. माजी आमदार दीपक आत्राम द्वितीय पुरस्कार पंधरा हजार रु.जि. प.उपाध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार तर तृतीय पुरस्कार अकरा हजार रु.जि. प.महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनगाम व आविस तालुका अध्यक्ष नंदुभाऊ मट्टामी यांनी यावेळी सर्व पुरस्कार मंडळाचे आयोजकांना देण्यात आले .
या टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक नंदुभाऊ मट्टामी तर संचालन आणि आभार प्रज्वल नागूलवार यांनी मानले. क्रिकेट स्पर्धा यशस्वी आयोजनासाठी जय संघर्ष क्रिकेट मंडळाचे विनोद गावडे,सुनील वरसे,इंद्रजित शहा,सतीश वेळदा, विनोद तलांडे,संजय दुर्वा,वारलू नरोटे,प्रकाश दुर्वा व मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.