अखेर महाराष्ट्र बँकेच्या एटीएमची रूम ‘क्लीन’

0
616
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 

शहरातील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम रूममध्ये स्लीप्सचा सडा निर्माण झाल्यामुळे स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसत होते. सदर बाब वृत्तपत्रामध्ये येताच अखेर महाराष्ट्र बँकेच्या एटीएम रूमची सफाई करण्यात आली आहे. तसेच मशीनचे नंबरचे किपॅड सुध्दा बदलविण्यात आले आहे.

स्थानिक आठवडी बाजारास्थित महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. एटीएम सुरू झाल्यापासुनच या एटीएमकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. या एटीएम रूममध्ये स्लीप्सचा कचरा निर्माण झाला होता. त्यामुळे ही बाब स्थानिक न्यूज पोर्टल व वृत्तपत्रामध्ये झळकताच अखेर संबंधितांना जाग आली व एटीएम रूम पुर्णत: स्वच्छ करण्यात आली आहे. मात्र या एटीएम रूमची सफाई नियमीतपणे होणार की पुन्हा काही दिवसांनी पहिलेसारखीच परीस्थिती होणार हे सुध्दा पाहणे महत्वाचे आहे. यासोबतच एटीएम मशीनच्या किपॅडवरील संपुर्ण नंबर दिसेणासे झाले होते. त्यामुळे नंबरचे किपॅडसुध्दा नवीन बसविण्यात आले आहे. मात्र या एटीएमवर सुरक्षा रक्षकाच्या नेमणुकीचा प्रश्न कायमच आहे.