*पत्रकार हनीफ शिकलगर यांना मारहाण करणाऱ्या इसमावर कारवाई करा- पत्रकार सुरक्षा समीतीची उमरगा पोलिस निरीक्षक यांच्या कडे मागणी.*

0
695
Google search engine
Google search engine

उमरगा प्रतिनिधी : साप्ताहिक विकास पर्व चे मुरुम येथील पत्रकार हानीप शिकलगर यांना दि. 10/12/2017 रोजी औराद पाटी उमरगा येथे आज्ञात काही इसमांनी मिळुन मारहान केली. त्याचा पत्रकार सुरक्षा समीतीच्या वतीने निषेध व्यक्त करुन तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबादचे पोलिस निरीक्षक यांना आज रोजी पत्रकार सुरक्षा समीतीच्या वतीने समक्ष भेटून पत्रकार हानीप शिकलगर यांना मारहाण करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
*48 तासात पत्रकार हानीप शिकलगर यांना मारहाण करणाऱ्या इसमावर अटक करुन कायदेशीर करवाई करण्यात येईल उमरगा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले यांचे पत्रकार सुरक्षा समीतीला ठोस आश्वासन.*
या वेळी पत्रकार सुरक्षा समीतीचे यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष, उमरगा तालुका अध्यक्ष पाशुमियाँ मुल्ला, उपाअध्यक्ष फय्याज शेख, महादेव सलके, सल्लागार आस्लम, शेडमवाले हानीप शिकलगर, जुबेर काजी, राजेंद गायकवाड, आमीर मुल्ला, नरहरी धुमाळ, कंटेकर इत्यादी पत्रकार उपस्थित होते .