(म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ही संकल्पना चुकीची आणि समाजविघातक !’- खासदार रामदास आठवले

0
854
Google search engine
Google search engine

‘लव्ह जिहाद’वर आधारित ‘जिवा’ चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन

 

मुंबई – समाजातील जातीव्यवस्था संपवण्यासाठी आंतरजातीय विवाह हा महत्त्वाचा उपाय आहे. हिंदु-मुस्लिम धर्मांतील युवक-युवतींनी एकमेकांवर प्रेम केल्यास समाजात ऐक्य निर्माण होईल. लव्ह जिहाद ही संकल्पना चुकीची आणि समाजविघातक आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार सर्वधर्मसमभावाचा विचार समाजात रुजवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले यांनी केले.

११ डिसेंबर या दिवशी दादर येथील रवींद्र नाट्यमंदिरात लव्ह जिहादवर आधारित ‘जिवा’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे खासदार आठवले यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी चित्रपटाचे निर्माता प्रदीप पायाळ, दिग्दर्शक राहुल मौजे, लेखक अर्जुन गावडे यांच्यासह चित्रपटात काम करणारे अन्य कलाकार उपस्थित होते. येत्या दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

याविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात खासदार आठवले यांनी म्हटले आहे की,

१. या चित्रपटातील प्रेमकथेतून एक सामाजिक ऐक्य निर्माण करण्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या प्रक्षेपणासाठी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाची काही अडचण आली तर मी आहे. (खासदार आठवले हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणार्‍या चित्रपटांना विरोध करण्यासाठी का पुढे येत नाहीत ? हा भेदभाव संविधानाच्या तत्त्वांविरुद्ध नाही का ? – संपादक)

२. राजस्थान येथे एका मुसलमान तरुणाची अत्यंत अमानवी पद्धतीने हत्या करण्यात आली. ही घटना निषेधार्ह आहे.

३. ‘लव्ह जिहाद’ च्या नावाने होणारा हिंसाचार सरकार रोखत आहे.