संग्रामपुर व जळगांव जामोद तालुक्यातील 140 गांव योजनेअंतर्गत पाणी पुरवठा पाच दिवस राहणार बंद

0
669
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण / बुलडाणा :-

जळगांव जामोद व संग्रामपुर तालुक्यातील 140 गांवे प्रादेशीक पाणी पुरवठा योजना प्रकल्पाची आवश्य़क व तातडीचे कामे करणेसाठी पाच दिवस जलशुध्दीकरण केंद्र व पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे लेखी पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगांव जामोद विभागाने गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी संग्रामपुर यांनी दिले आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडुन देण्यात आलेल्या पत्रात 140 गांवे प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेची कामे या विभागामार्फत करण्यात येत असून बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत.या योजनेमार्फत चाचणी स्वरुपात एप्रिल 2017 पासुन तालुकयातील 61 गावात अंशत: पाणी पुरवठा सुरु आहे.मात्र 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर या पाच दिवसाठी जलशुध्दीकरण केंद्र व पाणी पुरवठा बंद ठेवून आवश्यक कामे पूर्ण करण्यात येत असल्याने गावांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.सुरळीत पाणी पुरवठा होत असलेल्या ग्रामपंचायतची करारनामा व अनामत रक्कम ताबडतोब भरावी अन्यथा त्यांचा पाणी पुरवठा सुरु करता येणार नाही अशी माहिती या पत्राद्वारे जळगांव जामोद व संग्रामपुर तालुक्यातील तहसिलदार ,गटविकास अधिकारी ,नगरपंचायत मुख्यधिकारी तथा संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.