ब्राम्हणवाडा थडी येथील दोन पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात – अमरावती ACB ची कार्यवाही

0
678
Google search engine
Google search engine

 

11000 रुपयाची केली होती मागणी

 

चांदुर बाजार  / विशेष प्रतिनिधी – 

चांदुर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथील पोलीस हेडकोस्टबल आणि नाईक पोलीस कॉस्टबल हे दोघे जण अमरावती च्या लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले.

श्री  राजेंद्र ओंकाराराव हिरुळकर वय 47 वर्ष आणि श्री जितेश गोविंदराव सावरकर वय 34 वर्ष हे दोघे जण ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते.आणि अवैध रित्या दारूचा व्यवसाय करणाऱ्या पासून 11000 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागात दाखल केली होती.लाचलुचपत विभाग यांनी बुधवारी दिनांक याना पकडण्यासाठी सापळा रचला होता मात्र त्या दोघांना याची माहिती लागल्याने दोघांनी ही त्या ठिकाणावरून पळ काढला होता.मात्र आज दिनांक 16 डिसेंबर ला दोघे जण पोलीस स्टेशन येथे आले  असता त्यांना अमरावती लाचलुचपत विभागाच्या टीम ने ताब्यात घेतले. अवैध दारू विक्रेता याच्या वरील तडीपरीची कार्यवाही थांबविण्याकरिता ही पैश्याची मागणी केली होती. ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन हे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू होते.मात्र अमरावती लाचलुचपत विभागाच्या कार्यवाही मुळे कुपणच शेत खात होते का अशी चर्चा आता तालुक्यात आणि वरिष्ठ पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे. चांदुर बाजार तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन या नंतर ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन येथील ही लाचलुचपत विभागाची दुसरी कार्यवाही आहे. श्री राजू हिरुळकर हे ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन या ठिकाणी खुफिया म्ह्णून कार्यरत होते.
ब्राम्हणवाडा थडी येथील नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे चर्चा विषय ठरत आहे. वरील कार्यवाही लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक नाशिककर मैडम याच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक श्री  डी. एन.उरडे आणि अमरावती च्या त्याच्या टीम ने केली आहे.