अकोला महापालिकेची दोन नगरसेवकांविरुद्ध पोलिसांत तक्रार

0
638
Google search engine
Google search engine

अकोला : डम्पिंग ग्राऊंडच्या मुद्यावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा करणाऱ्या शिवसेना आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांविरुद्ध महापालिका प्रशासनाने पोलिस तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे उद्या रविवारी केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात येत असून या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर सत्ताधारी भाजपविरुद्ध शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारिप-बमसंचा वाद पेटल्याने राजकीय वातावरण तापले आहे.