‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेसाठी नरखेड तालुक्याची  निवड  – आजपासून नरखेड येथे कार्यशाळेचे आयोजन

0
725
Google search engine
Google search engine

तालुक्यातील सर्व नागरिकांनी कार्यशाळेमध्ये सहभागी व्हण्याचे नागपूर जिल्हा प्रशासन व पाणी फाउंडेशन ने केले आवाहन !

*अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ साठी नरखेड तालुक्याची निवड करण्यात आली आहे.*

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी

अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ साठी नरखेड तालुक्याची निवड करण्यात आली आहे. पाणी फाऊंडेशन महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवीत असून, या वर्षाकरिता पाणी फाऊंडेशनने जवळपास ७५ तालुक्यांची निवड केली आहे. त्यात नरखेड तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यात राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती देण्यासाठी 20 आणि 21 डिसेंम्बर ला पंचायत समिती नरखेड येथे 20 तारखेला वेळ सकाळी 10 वाजता कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले आहे कार्य शाळा संपल्या नंतर प्रदर्शनी सुरू होईल आणि 21 तारखेला वेळ सकाळी 10 वाजे पासून शाळा विद्यालय तथा महाविद्यालय या करिता प्रदर्शनी सुरू राहील
२० व २१ डिसेंबरला नरखेड पंचायत समिती येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘पाणी फाऊंडेशन’ हे नरखेड तालुक्यातील पाणीटंचाई प्रश्न सोडविण्यासाठी गावागावात लोकांना प्रोत्साहित करून मृद व जलसंधारण, पाणलोट व्यवस्थापनाची शास्रशुद्ध पद्धत, उत्तम कामगिरी करण्यासाठी आणि विषयातील विज्ञानात लोकांना प्रशिक्षण देणार आहे. त्यातून गाव, तालुका टँकरमुक्त , अधिग्रहण करणे, जलसंधारण कामाची लोकचळवळ, गावाच्या विविध प्रश्नांवर काम करणा-या सेवाभावी संस्था, लोक सहभागातून उभी केली आहे. स्पर्धेच्या काळात जलसंधारण, आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करणाऱ्या वेगवेगळ्या गावांसाठी ही स्पर्धा असून याची आतापासून तालुक्यातील सर्व गावांना तयारी करावी लागणार आहे. प्रत्यक्ष स्पर्धा ही ८ एप्रिल ते २२ मे २०१८ दरम्यान असणार आहे. यात ज्या गावांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांना तात्काळ नाव नोंदणी करून द्यावी लागणार आहे. सिने अभिनेता आमिर खान, किरण राव यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या उपक्रमाबाबत नरखेड वासियांना उत्सुकता लागली आहे. प्रशिक्षणासाठी आयोजित कार्यशाळेस पाणी फाउंडेशन ची तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.

वॉटर कप स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना राज्य पातळीवरचे पहिले बक्षीस ७५ लाख रुपये, दुसरे बक्षीस ५० लाख रुपये, तिसरे बक्षीस ४० लाख रुपये या शिवाय तालुका पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गावास १० लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत नरखेड तालुक्यातुन जास्तीत जास्त गावांनी सहभाग नोंदवावा आणि आयोजित कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर जिल्हा प्रशासन व पाणी फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.