ताज्या घडामोडीशेत-शिवार

“उद्योगभारतीच्या कृषि व्यावसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन” जिल्ह्यातील पहिलेच कृषि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र.

मोफत कृषि व्यावसाय प्रशिक्षणाकरता प्रवेश सुरु.

अधिकाधिक पदवीधर सुशिक्षित बेरोजगारांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे उद्योगभारतीचे आवाहन.

 

 

महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या  प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत उद्योगभारतीच्या “कृषि व्यावसाय प्रशिक्षण केंद्राचे” काल दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी उदघाटन करण्यात आले. उद्योगभारतीचे कृषि व्यावसाय प्रशिक्षण केंद्र हे जिल्ह्यातील पहिलेच कृषि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहे.उद्योगभारती कृषि व उद्योजकतेतील विविध सेवांमुळे अल्पावधीत राज्यभरात लोकप्रिय ठरलेला राज्य कृषि पदवीधर संघटनेचा उद्योजकता विकास प्रशिक्षण व सल्ला सेवा विभाग आहे. विविध क्षेत्रातील तंत्रज्ञ्,सल्लागार, प्रशिक्षकांचे आणि त्याच बरोबर प्रशिक्षणातून घडवलेल्या यशस्वी उद्योजकांचे जाळे उद्योगभारतीकडे उपलब्ध आहे.उद्योगभारतीच्या कृषि व्यावसाय प्रशिक्षण केंद्राद्वारे सुशिक्षित बेरोजगार,पदवीधर युवकांना कृषि क्षेत्रातील व्यवसायाचे शास्त्रशुद्ध व तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिल्या जाणार असून प्रशिक्षण पूर्णत्वानंतर प्रशिक्षणार्थ्याला शासकीय प्रमाणपत्र सुद्धा दिल्या जाणार आहे.प्रमाणपत्र प्राप्त प्रशिक्षणार्थ्याला रॊजगार किंवा व्यावसाय उभारणीचे मार्गदर्शन सुद्धा उद्योगभारतीतर्फे करण्यात येईल.प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षणाकरता प्रवेश सुरु आहेत.प्रवेशकर्ता ८२३७५७२३१५ या क्रमांकावर संपर्क करावा. अधिकाधिक पदवीधर व सुशिक्षित बेरोजगारांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योगभारतीचे संचालक कृषिभूषण.महेश कडूस पाटील यांनी केले.

 

 

सदर कार्यक्रमास कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक श्री.संपत चाटे अध्यक्ष स्थानी उपस्थित होते तर कृषि पदवीधर संघटनेचे संस्थापक तथा उद्योगभारतीचे संचालक कृषिभूषण महेश कडूस पाटील,प्रहारचे श्री.दत्तू बोडके,कौशल्य विकासचे श्री.चव्हाण, डॉ.प्रशांत नाईकवाडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव टोम्पे यांनी व आभार प्रदर्शन गिरीश वैष्णव यांनी केले.साधना जाधव,मंगेश पेखळे,जगन काकडे,मयुर काशिद,भूषण खडे,पवन खांदवे मुकुंद पिंगळे,संस्थेचे सदस्य व पदवीधर,विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.