नागपुर येथे उद्या बुलडाणा जिल्हा दारुबंदीसाठी धडक मोर्चा

0
542
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण – बुलढाणा-

बुलडाणा :- बुलडाणा जिल्हा संपुर्ण दारुबंदी साठी गेल्या पाच वर्षापासुन विविध आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र लढा दिल्या जात आहे.यात विविध अभिनव आंदोलने करुन निवेदने देऊन सरकारचे लक्ष वेदण्याचे प्रयत्ऩ करीत आहे. यात सरकारचे लक्ष्‍ा वेधण्यासाठी मुंडण,लोटागंण,शोले,बिनाछत्र बॉटल बैठा आंदोलन आणि अनेक तिव्र आंदोलन केलेले आहेत. तसेच बुलडाणा जिल्हा दारुबंदीसाठी उदया दि.21 डिसेंबरला विधानभवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात बुलडाणा मातृतिर्थातील महिला आणि पुरुष वर्ग यामध्ये बचत गटाच्या महिला आणि अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ आणि अस्तिव संघटना आदि कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती अस्तित्व़ संघटनेच्या प्रेमलता वाघ सोनोने यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे दिली आहे.