श्री.संत गाडगेबाबा पुण्यतीथी निमित्त़ संग्रामपुर शहरात पालखीसोहळा व स्वच्छता अभियान

0
1289
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण -बुलडाणा-

बुलडाणा :- संग्रामपुर येथे श्री संत गाडगेबाबा पुण्यतीथी निमित्त़ आज दिनांक 20 डिसेंबर रोजी संग्रामपुर शहरामध्ये दिंडी सोहळा व स्वच्छता अभियान राबविण्यात आले .

श्री संत गुलाबबाबा कनिष्ठ़ महाविद्यालयात संग्रामपुर येथे श्री संत गाडगेबाबा पुण्यतीथीनिमित्त़ प्रथम श्री.संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यानंतर शहरामध्ये दिंडी सोहळा व स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. यावेळी संग्रामपुर शहरामध्ये विद्यार्थांनी स्वच्छता करुन व स्वच्छता राखा,गोपाल गोपाला देवकीनंदन गोपाल असे नारे देत शहरामध्ये संदेश दिला तसेच विद्यार्थ्यांमधुन एका विद्यार्थ्याने गाडगेबाबांचा पोशाख परीधान करुन गाडगेबाबांची पालखी विद्यार्थ्यांसह गावातुन काढुन संग्रामपुर बस स्थानकावरती श्री संत गाडगेबाबा यांचे सन 1956 चे अखेरचे किर्तन व भजन मुलांनी पालखीचे समारोह केला. यावेळी प्राचार्य थोटांगे सर , दिपक मोहड सर , अरुण ढगे सर , किशोर राठोड सर , तसेच संस्थेचे सचिव गोपाल रहाटे ,उपाध्यक्ष पदमाकर मारोडे व श्री संत गुलाबबाबा विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थींनी यांची उपस्थिती होती. अशी माहिती श्री संत गुलाबबाबा विद्यालयाचे विद्यार्थी सौरभ बावस्कार यांनी एका प्रसिध्दी पत्राद्वारे दिली आहे.