मराठी चित्रपटांना मिळणार प्राईम टाईम – पत्रकार संरक्षण समितीचा दणका

0
806
Google search engine
Google search engine

नागपूर /पुणे :  पत्रकार संरक्षण समितीच्या पत्रकार – सांस्कृतिक करमणूक विभागा तर्फे  मराठी चित्रपट देवा व गच्ची या चित्रपटांना प्राईम टाईम देण्यासाठी नागपूर येथे   सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना  पत्रकार संरक्षण समितीच्या  पत्रकार – सांस्कृतिक करमणूक विभागा तर्फे चित्रपटांना प्राईम टाईम देण्यासाठी जिल्हाध्यक्ष डॉ. आशिष आटलोए यांनी  निवेदन देण्यात आले यावेळी सांस्कृतिक मंत्री मा.विनोद तावडे यांनी मराठी चित्रपटास योग्य ते सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

 

 

      अभिनेता सलमान खानचा टायगर जिंदा है आणि मराठीतील देवा आणि गच्ची हे चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. टायगर जिंदा है चे शो   हवे असतील तर थिएटरमधले 95टक्के शो हे आम्हाला द्यायला हवेतअसा सज्जड दम या चित्रपटाकडून थिएटर ओनर्सवितरक यांना भरण्यात आला आहे.यशराजसारखा मोठा बॅनर असल्यामुळे त्यांच्या हो ला हो करणं थिएटरवाल्यांच्या हातात आहे . मात्र सलमान खानच्या टायगर जिंदा है’ या सिनेमामुळे मराठी चित्रपट देवा आणि गच्ची यांना थिएटर्स मिळणं कठीण झालं आहे.          

     मराठी चित्रपटांना आपल्याच राज्यात स्क्रीनिंगसाठी भीक मागावी लागतेही किती लाजिरवाणी गोष्ट आहे . महाराष्ट्रात मराठी सिनेमालाच प्राधान्य मिळायला हवंमराठी सिनेमांना स्क्रीन न देणाऱ्या मल्टिप्लेक्सचे लायसन्स रद्द करावेतअशी मागणी  पत्रकार संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष अनिल चौधरी यांनी निवेदनाद्वारे  तावडे यांच्याकडे केली आहे .