चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )
चांदुर रेल्वे नगरीचे कॉंग्रेसचे माजी युवा नगराध्यक्ष, साईनाथ कॉलनीतील रहिवासी अभिजीत अशोकराव सराड (वय-३९) यांचे गुरूवारी सकाळी अल्पशा आजाराने नागपुर येथील रूग्णालयात दुख:द निधन झाले.
त्यांनी नोव्हेंबर 2015 ते 2016 पर्यंत स्थानिक नगर परीषदेचे अध्यक्षपद भुषविले. त्यांच्या निधनाने चांदुर रेल्वे तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे आई, भाऊ, पत्नी, २ मुली असा बराच मोठा आप्तपरीवार आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात स्थानिक हिंदु स्मशानभुमीत गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.