नविन वर्षाच्‍या पुर्व संध्‍येला सलग दहा दिवस शिर्डीत असणाऱ्या सांस्‍कृतिक कार्यक्रमांची मेजवानीचा लाभ साईभक्‍तांनी घ्‍यावा – डॉ. सुरेश हावरे

0
1057
Google search engine
Google search engine

नागपूर/शिर्डी. ( शाहरुख मुलाणी ) – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त साईभजन संध्‍या, मराठी बाणा, साई गितांजली, आदीवासी नृत्‍य व फुगडी, लोकनृत्‍य, हिंदी साईभजन, साईभजन, साई-स्‍वर गीत संध्‍या आदी विविध सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दिनांक २३ डिसेंबर २०१७ ते दिनांक ०१ जानेवारी २०१८ याकालावधीत करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.

डॉ.हावरे म्‍हणाले, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त विविध सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन साईनगर येथील मैदानावर सायं.७.०० ते रात्रौ ९.३० यावेळेत करण्‍यात आले असून यामध्‍ये शनिवार दि.२३ डिसेंबर रोजी रुपकुमार राठोड व सौ. सुनाली राठोड, मुंबई यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम होणार आहे. रविवार, दिनांक २४ डिसेंबर अशोक हांडे, मुंबई यांचा सुमारे १५० कलाकारांचा समावेश असणारा “मराठी बाणा” हा मराठी संस्‍कृती व परंपरेचे दर्शन घडविणारा संगीताचा भव्‍य कार्यक्रम होणार आहे. तसेच सोमवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सौ. विशाखा पार्सेकर, मुंबई यांचा साई गितांजली हा कार्यक्रम, मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी आदीवासी कांबडवने व महिला फुगडी नृत्‍य मंडळ, शिंगणवाडी (लव्‍हाळवाडी), ता. अकोले यांचा नृत्‍य व फुगडी हा कार्यक्रम, बुधवार दिनांक २७ डिसेंबर रोजी श्री चामुंडेश्‍वरी फुगडी मंडळ, कुडाळ यांचा लोकनृत्‍य हा कार्यक्रम, गुरुवार दिनांक २८ डिसेंबर रोजी बादल बात्रा, नागपूर यांचा हिंदी साईभजन हा कार्यक्रम, शुक्रवार दिनांक २९ डिसेंबर रोजी डॉ. भरत जेठवाणी, सप्‍तरंग चॅरीटेबल ट्रस्‍ट यांचा लोकनृत्‍य कार्यकम, शनिवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सच्चिदानंद आप्‍पा, मुंबई यांचा साईभजन हा कार्यक्रम, रविवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी विजय साखरकर, मुंबई यांचा साई-स्‍वर गीत संध्‍या  हा कार्यक्रम व सोमवार दिनांक ०१ जानेवारी २०१८ रोजी सुखविंदर सिंग व सजदा सिस्‍टर्स, मुंबई यांचा साईभजन असे विविध सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. दिनांक ३१ डिसेंबर रोजी सरत्‍या वर्षाला निरोप व नववर्षाच्‍या स्‍वागतानिमित्‍त रात्रौ ९.३० ते १२.०० यावेळेत नीरज शर्मा, दिल्‍ली यांचा साईभजनचा कार्यक्रम साईनगरच्‍या मैदानावर आयोजित केला असून या सांस्‍कृतिक कार्यक्रमांच्‍या मेजवानीचा साईभक्‍तांनी लाभ घ्‍यावा असे आवाहन डॉ. हावरे यांनी केले आहे.