*श्री संत गाडगेबाबा क.म.वि येथे संत गाडगेबाबा  पुण्यतिथी साजरी*

0
628
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधी /गजानन खोपे

भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या खोलापूर — श्री संत गाडगेबाबा कनिष्ठ महाविद्यालय खोलापूर येथे मोठया उत्सहात गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली । त्यावेळी घेतलेल्या कार्यक्रम मध्ये अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक ए वि गिरी सर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा एस के पुंडे मॅडम , जवंजाळ सर , राऊत सर हे होते ।सर्व प्रथम गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे होऊन गाडगेबाबा च्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला ।कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले । त्यामध्ये प्रामुख्याने गाडगेबाबा हे स्वछता चे जनक होते असे मत प्रा संगिता पुंडे यांनी मांडले ।कार्यक्रम चे संचालन कु चैताली देशमुख तर आभार प्रदर्शन कु साक्षी पोहेकार यांनी केले । कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले ।