तीन दिवसीय क्रिकेट सामन्यांचे थाटात उद्घाटन संपन्न ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुपचे आयोजन

0
891
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )

चांदुर रेल्वे शहरातील ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुप’ तर्फे तीन दिवसीय भव्य प्लास्टीक बॉल क्रिकेटचे खुले सामन्यांचे आयोजन शनिवारपासुन करण्यात आले असुन या सामन्यांचा उद्घाटन सोहळा अमरावती बायपास, मेट कॉलनी जवळील टी. एस. ग्राऊंडवर शनिवारी सकाळी थाटात संपन्न झाला.

या सामन्यांचे फित कापुन उद्घाटन परीक्षीत विरेंद्र जगताप यांच्याहस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी होते. तसेच प्रमुख पाहुने म्हणुन न.प. उपाध्यक्ष देवानंद खुणे, शैलेंद्र मेटे, नगरसेवक वैभव गायकवाड, शिक्षण व आरोग्य सभापती सतपाल वरठे, महिला व बालकल्याण सभापती शबाना परविन अब्दुल हमिद, प्रमोद नागमोते आदींची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. मान्यवरांनी उपस्थित खेळाडुंना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘दि ग्रेट टिपु सुलतान’ ग्रुपचे सर्व सदस्य सुध्दा उपस्थित होते.