अमरावती-अकोला मार्गावर लोणी नजिक भीषण अपघात – 4 ठार, ६ जखमी- चौघांची प्रकृती चिंताजनक.

0
594
Google search engine
Google search engine

108 रुग्णवाहिका व वँगेनार कार मध्ये जोरात धडक

अमरावती – अमरावती-अकोला महामार्गावर लोणीहून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या नागझिरा फाटा येथे परस्पर विरूद्ध दिशेने भरधाव वेगात येत असलेली रुग्णवाहिका (एम. एच. १४, सीजी १८९३) आणि वँगेनार कार (एम. एच. ४०, ए.आर. ५९७०) यांची आपसात जोरदार धडक झाली. रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात 4 जण ठार तर ६ जण जखमी झालेत. म्रुतकांमध्ये एका ८ वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जखमींपैकी चौघांची प्रक्रुती चिंताजनक असल्याचे समजते. अपघातस्थळ हे मुर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते.