मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते आज धुळे येथे खान्देश कॅन्सर सेंटरचे भूमिपूजन

0
672
Google search engine
Google search engine

धुळे:-

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे येथे खान्देश कॅन्सर सेंटरचे भूमिपूजन केले. केंद्रीय मंत्री श्री सुभाष भामरे, राज्यातील मंत्री श्री गिरीश महाजन, श्री जयकुमार रावल, श्री दादाजी भुसे यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी राम सर्जिकल हॉस्पिटलचे उदघाटन सुद्धा केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग रुग्णालय स्थापन व्हावे, या दिशेने आम्ही काम करीत आहोत, जेणेकरून लोकांना आपल्या स्वतःच्या गावात चांगले उपचार घेता येतील. मुख्यमंत्री सहायता निधीमधून सुद्धा आम्ही मोठ्या संख्येने गरजूंना मदत करीत आहोत. राज्य सरकारने आरोग्य सुविधेच्या क्षेत्रात हाती घेतलेल्या अनेक उपायांची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.