उद्योगभारतीच्या मोफत कृषी व्यवसाय प्रशिक्षणास सुरुवात. “ पदवीधर व सुशिक्षित बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ”

74

नाशिक :- 

 

राज्य कृषि पदवीधर संघटनेच्या उद्योगभारती या उद्योजकता विकास व प्रशिक्षण विभागाद्वारे राज्य शासन पुरस्कृत प्रमोद महाजन उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत मोफत कृषि व्यवसाय प्रशिक्षणाची सुरुवात दि.२३ डिसेंबर २०१७ रोजी उद्योगभारती नॉलेज सेन्टर,नाशिक येथे झाली.राज्यातील सुशिक्षित बेरोजगार व पदवीधरांकरता उत्तम दर्जाचे कृषि व्यवसाय प्रशिक्षण उद्योगभारती मार्फत मोफत दिल्या जात आहे.पदवीधर व सुशिक्षित बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रशिक्षणाच्या पुर्णत्वानंतर शासकीय प्रमाणपत्र दिल्या जाणार असून शासकीय योजनांचा लाभ प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना घेता येणार आहे.उद्योगभारतीमार्फत राज्यातील जास्तीत जास्त पदवीधर व सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार,स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस  उद्योगभारतीचे संचालक कृषिभूषण.महेश कडूस पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.