कार्तिक कॉम्पुटर जॉब वर्क एजन्सी कडून ग्रामीण भागातील महावितरण ग्राहकांची लुट – मीटर रीडर आणि एजन्सी याच्या भोंगळ कार्यभाराला कोण लावणार अंकुश? @cbawankule

0
1200
Google search engine
Google search engine

डिसेंबर महिन्याचे रिडींग चक्क 42 दिवसाचे घेतले जात आहे,ग्राहकांना बसणार याचा फटका.

प्रल्हादपूर:-श्री शशिकांत निचत

महावितरण कडून होणारी ग्राहकांची लूट,थाबविण्याकरिता महावितरण ने आपले सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरु केले आहे.या मध्ये मीटर चे रिडींग घेणे,बिल भरणे,बिलाचा तपशील चेक करणे इत्यादी त्यामुळे महावितारणच्या कामात पारदर्शकता आले असल्याचे स्पस्ट जरी होत असले तरी चांदुर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागातील महावितारच्या ग्राहकांची लूट डिसेंबर महिन्यात मीटर चे रीडिंग घेत असल्याचे स्पस्ट होते आहे.
नोव्हेंबर महिन्यात ग्राहकाचे मीटर चे रिडींग हे 7 ते 15 तारखेच्या जवळपास संपले होते.मात्र आता डिसेंबर महिना संपत आला तरी मीटर रीडिंग व्हायचे आहे.
जे रिडींग 30 दिवसाच्या आत जायला पाहिजे होते आता ते 40 ते 42 दिवसांनी घेतले जात आहे.या मुळे याचा सर्व करार घेणारी कार्तिक कॉम्पुटर जॉब वर्क एजन्सी हि आपला मनमानी पना करीत असून त्यांचे रीडर हे रिडींग घेत असताना ग्राहकाची आर्थिक लूट करत असल्याचे हि काही प्रकरणे समोर आली आहे.
स्वतःला अभियंता समजणारे खाजगी मीटर रीडर हे आपल्या आर्थिक लोभासाठी ग्राहकांची चांगली कोंडी करीत आहे.त्यामुळे कार्तिक कॉम्प्युटर जॉब वर्क हि एजन्सी ग्राहकाची होणारी लूट कधी पर्यंत करत राहील याचे उत्तर अजून एखाद्या न सुटणाऱ्या कोड्याप्रमाणेच आहे.
राजकीय पक्षाच्या तर त्यानापाठबल मिळत नसेल न अशी ही चर्चा आता ग्रामीण भागात जोर पकडत आहे तर राजकीय नेते याच्या विरोधात आवाज का उठवत नाही असे असंख्य प्रश्न आता ग्रामीण भागातील जनते समोर तर आहे मात्र याचा रोष हा महावितरण कार्यलाय याच्या वर तर निघणार नाही अशी शंका सुद्धा व्यक्त केली जात आहे.

1ते 100 युनिट पर्यंत वापर झाल्यास कमी वीज शुक्ल आकारण्यात येतो,100ते 300 पर्यंत वेगळा वीज शुल्क लागतो मात्र रिडींग वेळेवर आणि 30 दिवसाच्या आत जात नसल्याने ग्राहकाचे रिडींग हे कधी 100 युनिट तर कधी 150 युनिट अशा वापर दाखवत आहे त्यामुळे मीटर रीडर एजन्सी ला कोण खतपाणी घालत आहे आणि कोण या भ्रष्टचार याचा कर्ता आहे हे शोधणे खूप अनिवार्य झाले आहे.

चांदुर बाजार उप-कार्यकारी अभियंता श्री सुधीर वानखडे यांनी जेव्हा पासून चांदुर बाजार येथील महावितरण कार्यलाय कार्यभार साभाडळा तेव्हापासून अनेक वीज चोरी करणारे याचे धाबे त्यांनी दणाणून टाकले.अनेक ग्राहक प्रति आणि शेतकरी याचा हितपयोगी निर्णय त्यांनी घेतले मात्र कार्तिक कॉम्पुटर जॉब वर्क याचा मनमानी पणा त्यांचा लक्षात का नाही आला.आणि या सर्वांकडे ते जाणीव पूर्वक तर दुर्लक्ष करीत नाही अशी ही चर्चा आता चांगलीच रंगात आहे त्यामुळे त्या एजन्सी वर कार्यवाही करण्यात सुधीर वानखडे उपकार्यकारी अभियंता याना यश येणार कि ग्राहकाची लूट एखाद्या राजकीय मंडळी च्या दबावाखाली होतच राहणार हे पाहावेच लागेल.