दापोरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या  स्मृती महोत्सवास सुरुवात-ह भ प ग्रामगीताचार्य रायजीप्रभु शेलोटकर  महाराज यांच्या अमृतवाणीतून ग्रामगीता प्रवाचनास सुरुवात

0
771
Google search engine
Google search engine

रुपेश वाळके / मोर्शी तालुका प्रतिनिधी –

मोर्शी तालुक्यातील दापोरी येथे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ४८ वा स्मृती महोत्सव व सर्व संत यांच्या स्मृती दिनानिमित्य संगीतमय ग्रामगीता प्रवचन ह भ प ग्रामगीताचार्य रायजीप्रभु शेलोटकर महाराज यांच्या मधुर वाणीतून संपन्न होत आहे . दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांनी आजन्म सेवा करीत भारताच्या विश्वमानवाच्या सुख समृद्धी उद्धारासाठी अविरत परिश्रम घेतले , शुद्ध त्यागमय बंधुत्वाचा अमृतमूल्य बोध दिला , एकात्मता , विश्व बंधुत्व , विश्वशांती , अंधश्रद्धा , सामुदायिक प्रार्थना , रामधून , हि महान साधना बनवून ग्रामवासीयांना जागृत केले हे सर्वश्रुतच आहे आज काळाचे गरजेनुसार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आचार विचारांची आचरणाची अत्यंत गरज आहे , त्यामुळे या महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवामध्ये सामुदायिक द्यान , प्रबोधन , स्वच्छता अभियान , रांगोळी स्पर्धा , संस्कारित महिला काळाची गरज या विषयावर व्याख्यान , सत्संग , भजन, व्यसनमुक्ती , संत कोणाला म्हणावे या विषयावर डॉ संदीप राऊत यांचे यांचे व्याख्यान , आणि ३१ तारखेला दापोरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा निघणार असून काल्याचे कीर्तन ग्रामगीताचार्य श्री रायजीप्रभु शेलोटकर महाराज यांच्या हस्ते होणार असून या महोत्सवामध्ये यासारखे विविध उपक्रम राबविले जाणार असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन गुरुदेव सेवा मंडळातर्फे करण्यात आले असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा स्मृती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याकरिता दापोरी येथील युवक व गावकरी मंडळी अथक परिश्रम घेत आहे .