*भाजपा सोशल मीडिया सेलची बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर*

0
656

दयालसिंग चव्हाण / बुलडाणा : –

भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया सेलची जिल्हा बैठक २५ डिसेंबर रोजी बुलडाणा येथे शासकीय विश्रामगृहात पार पडली. या वेळी प्रदेश सहसंयोजक त्रिकाल अडसड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा संयोजक रेणुकादास मुळे यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.
राज्याचे कृषी व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती, प्रदेश सरचिटणीस आ. डाँ. संजय कुटे, सोशल मीडिया सेलचे प्रदेश संयोजक आशीष मेरखेड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सागर फुंडकर, विदर्भ संयोजक केतन मैहितकर, आ. अँड. आकाश फुंडकर व पक्षाचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, यांच्या मार्गदर्शनात जिल्हा संयोजक रेणुकादास मुळे यांनी भाजपा सोशल मिडीया सेलची जिल्हा कार्यकारिणी तयार केली. सेलचे प्रदेश सहसंयोजक त्रिकाल अडसड यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलडाणा येथील जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सदर कार्यकारिणीमध्ये जिल्हा सहसंयोजक पंकज कड, भिकु लोळगे, संपर्क प्रमुख प्रसाद कंगले, बुलडाणा शहर संयोजक निलेश खडके, चिखली तालुका – भारत दानवे, चिखली शहर – श्रीरंग जोशी, खामगाव तालुका – उमेश धोन, खामगाव शहर – यश आमले, मलकापूर तालुका – राहुल देशमुख, मलकापूर शहर – योगेश निंबोळकर, जळगाव जामोद तालुका – धीरज सावरकर, जळगाव जामोद शहर – निलेश धुरडे, नांदुरा तालुका – शिवशंकर ढोले, नांदुरा शहर – ब्रह्मानंद चौधरी, मोताळा तालुका – उदय भोळे, संग्रामपूर शहर – उध्दव व्यवहारे, शेगाव तालुका – विठ्ठल अहिर, मेहकर तालुका – ओम सोनूने, मेहकर शहर – निखील वाढवे, लोणार शहर – पवन शर्मा, सिंदखेड राजा तालुका – प्रसाद कुळकर्णी, सिंदखेड राजा शहर – शुभम व्यवहारे, देऊळगाव राजा तालुका – एकनाथ काकड, देऊळगाव राजा शहर – सुजीत गुंडे यांना या बैठकीत नियुक्तीपत्रे देण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा संयोजक रेणुकादास मुळे यांनी केले. प्रदेश सहसंयोजक त्रिकाल अडसड यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांना पुढील कार्याबद्थल मार्गदर्शन केले.