बांगलादेशमध्ये हिंदूंच्या ६ मंदिरांतील १२ मूर्तींची तोडफोड करून विटंबना !

150

ढाका – बांगलादेशच्या नारायणगंज जिल्ह्यात असलेल्या लांगोलबंध भागातील श्री श्री रक्षा काली मंदिर, भैरव मंदिर, शीतल मंदिर, जयाकली मंदिर, शिव-पार्वती मठ मंदिर आणि अन्य एक मंदिर अशा एकूण ६ मंदिरांतील देवतांच्या १२ मूर्तींची १८ डिसेंबरच्या रात्री अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केली. मंदिरांच्या व्यवस्थापन समित्यांच्या पदाधिकार्‍यांनी या तोडफोडींची पोलिसांकडे तक्रार केली आहे.

बांगलादेशमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना बांगलादेश मायनॉरिटी वॉच या संघटनेचे प्रमुख अधिवक्ता रवींद्र घोष यांनी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांशी दूरभाषवर संपर्क केला. या वेळी पोलीस निरीक्षक अबुल कलाम आझाद म्हणाले की, आम्ही गुन्हा नोंदवला असून गुन्ह्याचे अन्वेषण करून आरोपींना अटक करू.

बांगलादेश सरकारने हानीभरपाई देऊन मूर्तींची विधीवत् स्थापना करावी ! – बांगलादेश मायनॉरीटी वॉचची मागणी

अधिवक्ता रवींद्र घोष यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर होत असलेल्या वाढत्या आक्रमणाविषयी चिंता व्यक्त केली. वरील घटनांना उत्तरदायी आरोपींना त्वरित अटक करून त्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणी केली. अधिवक्ता घोष यांनी बांगलादेश सरकारने हिंदूंच्या झालेल्या हानीसाठी त्यांना भरपाई देऊन नवीन मूर्तींची विधिवत् स्थापना करण्यास साहाय्य करावे, अशी मागणी केली.

चितगाव येथे २०० वर्ष जुन्या श्री श्री पिंगळा काली मंदिरातील प्रतिमेची तोडफोड

चितगाव जिल्ह्यातील काशीऐश येथे तोडफोड करण्यात आलेल्या देवतांच्या मूर्ती

चितगाव जिल्ह्यात असलेल्या काशीऐश गावातील २०० वर्ष जुन्या श्री श्री पिंगळा काली मंदिरातील काली देवीच्या प्रतिमेची २२ डिसेंबरच्या रात्री अज्ञातांनी तोडफोड केली. नुकतेच या मंदिराचे पुनर्निर्माण झाले आहे.

२२ डिसेंबरला रात्री भाविकांनी या मंदिरांत नित्य पूजा-आरती केली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांना काली मातेच्या मूर्तीचे हात तोडून भगवान शिवाची मूर्ती खाली टाकून दिल्याचे आढळून आले. मंदिरांच्या व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी श्री. अधिकुमार सेन यांनी पोटीया पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात  तक्रार नोंदवली. आरोपींनी मूर्तीच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली.

टीप : वरील छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून देवतांची विटंबना कशी करण्यात आली आहे, हे समजण्यासाठी प्रसिद्ध करत आहोत.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।