साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह हिंदुत्वनिष्ठांना गुंतवण्याचे षड्यंत्र उघड ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

0
619
Google search engine
Google search engine

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आतंकवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित, स्वामी अमृतानंदजी आदी ७ जणांवर मोक्का लावून गेली ९ वर्षे कारागृहात सडवले होते. त्यातून एन्आयए न्यायालयाने मुक्त करणे हे जितके आशादायी, तेवढेच त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्य विरोधी कायद्याच्या अंतर्गत लावण्यात आलेले आरोप दुर्भाग्यपूर्ण आहेत, असे आम्ही मानतो, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, ‘‘या प्रकरणात श्री. राकेश धावडे यांच्यावर ‘मकोका’ आहे; म्हणून त्यांना सर्वांत शेवटपर्यंत जामीन मिळाला नव्हता; मात्र आज त्यांनाच न्यायालयाने मालेगाव स्फोट प्रकरणातून दोषमुक्त केले. यातून आतंकवादविरोधी पथकासारख्या पोलीस संस्था राजकीय षड्यंत्राचा एक भाग बनून कार्य करतात, हे लक्षात येते. या प्रकरणात गोवण्यात आलेल्या निरपराध हिंदूंवरील अन्यायाची भरपाई कोण करणार, हा आता प्रश्‍न आहे ! ‘अंतिम विजय सत्याचा होतो’, हे सनातनने अक्षरशः अशा प्रकरणांमध्ये अनुभवले आहे. त्यामुळे न्यायदेवतेवर आमचा विश्‍वास आहे की, या प्रकरणात गोवण्यात आलेले सर्वच हिंदू निरपराध म्हणून मुक्त होतील. ‘मकोका’ रहित झाला, तसेच एक दिवस या प्रकरणातूनही हे सर्व जण मुक्त होतील, असे आम्हाला वाटते.’’