‘पद्मावती’ चित्रपटातील ‘ऐतिहासिक’ संदर्भांची समीक्षा करण्यासाठी परीनिरिक्षण मंडळाकडून जयपूरच्या इतिहासकारांना पाचारण !

0
792
Google search engine
Google search engine

जयपूर – वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटाची ऐतिहासिक संदर्भांची समीक्षा करण्यासाठी ‘केंद्रीय चित्रपट परीनिरिक्षण मंडळ’ अर्थात् ‘सेन्सॉर बोर्डा’ने जयपूरचे ज्येष्ठ इतिहासकार प्रा. आर्.एस्. खंगारोत आणि राजस्थान विद्यापिठाचे निवृत्त प्राध्यापक बी.एल्. गुप्ता यांना पाचारण केले आहे. चित्रपटाविषयी त्यांची मते मंडळ जाणून घेेणार आहे, अशी माहिती परीनिरिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी दिली.

राणी पद्मावतीचा चुकीचा इतिहास दाखवण्यात आल्याचा आरोप करत करणी सेना आणि राजपूत समाजाचे नेते यांनी या चित्रपटाला कडाकडून विरोध केला होता. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता; मात्र वाढता विरोध लक्षात घेऊन त्याचे प्रदर्शन लांबवणीवर टाकण्यात आले. हा वाद सोडवण्यासाठी परीनिरिक्षण मंडळाने समितीही स्थापन केली आहे.

याविषयी खंगरोत म्हणाले की, हा वाद ‘चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी विरुद्ध राजपूत समाज’ किंवा ‘करणीसेना विरुद्ध भन्साळी’ असा नाही, तर हा वाद ‘निर्माता आणि इतिहास’, असा आहे. याच दृष्टीकोनातून या चित्रपटाची समीक्षा केली जाईल.