मोझरी जवळ  गॅस भरलेला सिलेंडरचा ट्रक उलटला मोठी दुर्घटना टळली- घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या

0
828

तिवसा : नागपुरवरून अमरावतीकडे ४०० गॅस सिलेंडर भरलेले घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी ११.४५ वाजता घडली. यात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. सिलेंडर पेट घेत असल्याचे माहिती पडताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्याचा मारा केल्याने पुढील अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तिवसा तहसीलदार राम लंके यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

मोझरी नजीक चालत्या ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यात ट्रक चालक रंजित रघुनाथ वायरे (वय ३७ वर्ष रा.जामठा रोड नागपूर) हा जखमी झाला असून त्याला गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. ट्रकचालकाला झोपीची डुलकी आल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
अपघातानंतर शेकडो सिलेंडर शेतशिवारात अस्तव्यस्त पडले होते.
सिलेंडर चा भरलेला ट्रक पलटी झाल्याने बघ्यांची गर्दी घटनास्थळी होती. काही लोक सिलेंडर चोरून नेण्याच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी हा डाव हाणून पाडला. तसेच कुठलीही अनूचित घटना घडू नये, याकरिता घटनास्थळी पोलिस लक्ष ठेवून होते.