दैनिक पंचांग–  ०१ जानेवारी २०१८

0
700
Google search engine
Google search engine

दिनांक ०१ जानेवारी २०१८
*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* पौष १० शके १९३९
*शुक्र अस्त चालू आहे*
पृथ्वीवर अग्निवास नाही.
चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात १०:५८ पर्यंत नंतर स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०७:११
☀ *सूर्यास्त* -१८:०५

*शालिवाहन शके* -१९३९
*संवत्सर* -हेमलंबी
*अयन* -दक्षिणायन
*ऋतु* -हेमंत (सौर)
*मास* -पौष
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -चतुर्दशी (१०:५८ पर्यंत)
*वार* -सोमवार
*नक्षत्र* -मृग (१४:५१ नंतर आर्द्रा)
*योग* -शुक्ल (०९:५३ नंतर ब्रम्हा)
*करण* -वणिज (१०:५८ नंतर भद्रा)
*चंद्र रास* -मिथुन
*सूर्य रास* -धनु
*गुरु रास* -तुळ
*राहु काळ* -०७:३० ते ०९:००

*विशेष* -भद्रा १०:५८ ते २१:४७,अन्वाधान,कुळधर्मासाठी पौर्णिमा,रवि-सर्वार्थसिद्धियोग-अमृतसिद्धियोग १४:५१ पर्यंत
या दिवशी पाण्यात शंखोदक (शंखातील पाणी) घालून स्नान करावे.

शिव मानसपूजा या स्तोत्राचे पठण करावे.
“सों सोमाय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
शंकराला श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा.
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गाईचे दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.