दगडफेकीप्रकरणी श्री भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटेंवर गुन्हा दाखल

0
1024
Google search engine
Google search engine

पिंपरी : पुण्याजवळील सणसवाडीत झालेल्या दगडफेकीप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा श्री संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख श्री मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका महिलेच्या तक्रारीनंतर श्री संभाजी भिडे गुरुजी आणि श्री मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, अॅट्रॉसिटी, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव आणि असंघटित गुन्हेगारी या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.