पालघर जिल्ह्यातील भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीत निधन

100

नवी दिल्ली : पालघर जिल्ह्यातील भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीत निधन झालं. दिल्लीच्या राममोहन लोहिया रुग्णालयात चिंतामण वनगा यांची प्राणज्योत मालवली. ते 67 वर्षांचे होते. कालपासून चिंतामण वनगा यांच्या छातीत दुखत होतं.