महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी श्री संदीप बाजड यांची नियुक्ती.

0
1012
Google search engine
Google search engine

अमरावती : सामाजिक व धार्मिक कार्यात, मित्र तथा पत्रकार बंधूभगिनींच्या मदतीसाठी सदैव्य अग्रेसर असल्याचा जिवंत पुरावा म्हणजेच अमरावतीचे पत्रकार तथा मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांचे स्वीय सहाय्यक व जनसंपर्क अधिकारी संदीप बाजड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राज्य अध्यक्ष मा.श्री.राजा माने, राज्य संघटक मा.श्री.संजयजी भोकरे, मा.श्री.वसंत मुंढे, विदर्भ प्रमुख बाळासाहेब देशमुख, अमरावती विभागीय अध्यक्ष निलेश सोमाणी यांचे सूचनेनुसार राज्य सरचिटणीस मा.श्री.विश्वासराव आरोटे यांनी अमरावती जिल्हाध्यक्ष पदावर नुकतीच संदीप बाजड यांची नियुक्ती केली आहे. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांच्या नियुक्तीमुळे शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले, असून बाजड त्यांचे सर्वस्तरावरून अभिनंदन होत आहे.

पत्रकार हा आरस्या सारखा पारदर्शक असतो, त्याला घटनेच्या दोन्हींही बाजू दिसत असतात, आणि त्यावर तो आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असतो, म्हणूनच त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र हि कधी – कधी विरोधकांकडून आखल्या जात असत, परंतु विरोधकांवर सडेतोड उत्तर देण्यास आजच्या घडीला सोशल मिडिया कितीही पुढे गेला असला, तरी त्यावर मात्र कुणाचा विश्वास बसत नाही, त्यामुळे आज हि वृत्तपत्र किंवा इलेक्ट्रानिक्स मीडियातील पत्रकारांवर जो नागरिकांचा विश्वास आहे, तो तसाच कायम राहावा म्हणून संदीप बाजड यांनी अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातून सन ०१ जानेवारी २००२ पासून पत्रकारितेची सुरवात केली, आणि त्यांनी ती सर्वोदूर पोहचवून सुद्धा आजच्या घडीला कायम टिकवून ठेवली आहे. १६ वर्षापासूनचा पत्रकारितेचा प्रवास आज अमरावती जिल्ह्यात वास्तव्यात आहे. संदीप बाजड यांनी वृत्तपत्र श्रेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त केले असून त्यांनी विविध संघटनेचे महत्वपूर्ण पदेसुद्धा भूषविली आहेत. ते एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात पुढाकार घेत अनेकांना जीवदान देण्याचे कार्य सुद्धा केले. त्यासोबतच अमरावती येथे नुकताच भव्यदिव्य स्वरूपात पार पडलेल्या श्री संत गजानन विजयग्रंथ महापारायण सोहळ्याची महती राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात होऊन गेली, महापारायण सोहळ्याकरिता संदीप बाजड यांनी सर्वप्रथम १६ सप्टेंबर २०१७ रोजी विवेकानंद कॉलनी अमरावती येथील श्री संत गजानन महाराजाच्या मंदिरात सहा महिन्याअगोदर गजानन भक्तांची ओळख निर्माण व्हावी, याकरिता एका बैठकीचे आयोजन करून संदीप बाजड यांनी श्री संत गजानन विजयग्रंथ महापारायण सोहळ्याचा मानस हि गजानन भक्तांसमोर व्यक्त केला होता. त्याला श्री संत गजानन महाराज भक्त परिवार महापारायण सेवा समितीच्या आयोजकांनी तथा गजानन भक्तांनी महापारायण सोहळ्याला भरघोष प्रतिसाद दिला, माझ्या व माझी पत्नी अनिता बाजड हिच्या धार्मिक जीवनातील हा अविस्मरणीय क्षण ठरला आहे, या सोहळ्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नक्कीच नोंद होईल असा विश्वास हि संदीप बाजड यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. आजही पत्रकारितेच्या श्रेत्रात संदीप बाजड कार्यरत असल्याने त्यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांनी नियुक्तीचे सर्वश्रुत श्रेय जिल्ह्यातील पत्रकार बांधव-भगिनींना देत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहे.