मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – आम आदमी पार्टीची मागणी >< धर्मा पाटील यांचे आत्महत्याप्रकरण

0
1053
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
      धर्मा पाटील यांची शेतकरी विरोधी भाजपा सरकारने एक प्रकारे हत्याच केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे अमरावती संयोजक तथा चांदुर रेल्वे न. प. माजी उपाध्यक्ष श्री नितीन गवळी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातुन केली आहे.
      गेल्या आठवड्यात २२ जानेवारीला मुंबईत मंत्रालयात संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे, या मागणीसाठी विषारी औषध प्राशन करून धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ राज्य शासनाचा अमरावती आम आदमी पार्टीने निषेध नोंदवीला आहे. बेजबाबदार अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची गरज असुन प्रशासनाच्या निष्काळजी धोरणामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक नियोजनावर परिणाम होऊन असे अनेक ‘धर्मा पाटील’ यांची पुनरावृत्ती होऊ शकते असे ‘आप’ने म्हटले आहे. उत्पादनाच्या भावाच्या व उत्पन्नाच्या समस्येने आत्महत्या लाखोंच्या घरात गेलेल्या असतांना प्रशासनाच्या हलगर्जीपणाची त्यात भर पडणे हे सरकारचे अपयश आहे. त्यामुळे सरकारने नैतिक जबाबदारी स्विकारून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे अमरावती संयोजक नितीन गवळी, अॅड. नितीन उजगांवकर, महेश देशमुख, बशिरभाई, विरेंद्र उपाध्याय, मदन शेळके, संजय शाहाकार, अफसरभाई यांसह अनेक आप कार्यकर्त्यांनी केली आहे.