2 लाखांची लाच, IPS अधिकारी ACB च्या जाळ्यात

0
820

नांदेड : आयपीएस अधिकाऱ्याच्या वतीने एक लाखांची लाच स्वीकारताना एक जण एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. रेतीची कारवाई थांबवण्यासाठी आयपीएस अधिकारी श्री विजयकृष्ण यादव यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. अमरावती लाचलुचपत विरोधी पथकाने नांदेडमध्ये ही कारवाई केली.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिस स्थानकात कार्यरत असताना रेतीची कारवाई थांबवण्यासाठी यादव यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नांदेडच्या इतवारा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपी जी. विजय कृष्णन यादव ( IPS 2015 RR) सध्या उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नांदेडच्या इतवारा उपविभागात कार्यरत आहेत. यादव हे मूळ तेलंगणातील हैदराबादचे रहिवासी आहेत. दुसरा आरोपी सन्निसिंग इंदरसिंग बुगई नांदेडचा रहिवासी आहे.

सापळा कारवाई अहवाल

➡घटक : अमरावती
➡तक्रारकर्ता : पुरुष,वय 43 वर्षे
➡आरोपी : (1) श्री.जी.विजय कृष्णन यादव ( IPS 2015 RR) सध्या नेमणूक – उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा उपविभाग जिल्हा नांदेड रा.हैदराबाद ( तेलंगणा ) आरोपी क्र.(2) श्री. सन्निसिंग इंदरसिंग बुगई,वय 34 वर्षे,रा.बाबा दिपसिंग नगर, भगतसिंग रोड,नांदेड.

➡लाचेची मागणी- 2,00,000/- रू. पहिली इंस्टॉलमेंट 1,00,000/- रुपये
➡सापळा : दि.30/01/2018

➡स्विकारली लाच रक्कम- 1,00,000/- रू.
➡जप्त/हस्तगत रक्कम:- 1,00,000/- रू.
➡कारण:- यातील फिर्यादी यांना पोलीस स्टेशन तिवसा येथे त्याचेवर दाखल गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी,ट्रक सोडण्यासाठी,तसेच चार्जेशीट दाखल करण्यासाठी मदत केल्याबद्दल कामाचा मोबदला म्हणून