संत एकनाथ महाराज जयंती महोत्सवानिमित्त >< आज आमला विश्वेश्वर येथे भव्य यात्रा

0
2024

शहेजाद खान  / चांदूर रेल्वेः-

 

दोन दिवस चालणार यात्रा

दोन दिवस रात्री नाटकाचे प्रयोग होणार सादर

 

आमला विश्वेश्वर येथील श्री संत एकनाथ महाराज जयंती महोत्सव निमित्त ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला  दोन दिवस भव्य यात्रा भरणार आहे. त्या निमित्त श्री संत एकनाथ महाराजाच्या समाधीचे दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी लोटणार आहे. महोत्सवनिमित्त दोन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केले असुन त्यामध्ये नाटकाची मेजवानी राहणार आहे.

 

२४ ते ३० जानेवारी फेब्रुवारीला श्रीमद् भागवत सप्ताह उत्साहात पार पडला.  ३० जानेवारी ला सकाळी ११ वा. सौ.वंदना व विठोबाजी देव्हारे(मुंबई) यांचे हस्ते चांदीच्या पादूकांचे पुजन करण्यात आले. दूपारी १२ वाजता श्री संत एकनाथ महाराजाची प्रतिमा व चांदीच्या पादुकांची रथातुन भव्य मिरवणूक विश्वेश्वर मंदिर येथून गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. हा रथ २१ बैलजोड्यांनी ओढले. चौकाचौकात सुवासिनींनी श्री संत एकनाथ महाराजांच्या रथाचे पुजन केले. ३१ जानेवारी ला पहाटे ५ सामुदायिक ध्यान नंतर सकाळी ९ वाजता ह.भ.प.उज्वला बडगुले यांचे प्रवचन व दुपारी १ वाजता ह.भ.प महादेव माहुरे महाराज (वाई मेंढी जि.यवतमाळ) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.तर सायंकाळी ४ वाजता भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.या शिवाय १ पेâब्रवारीला वाढोणा येथे श्री संत एकनाथ महाराज मंदिरात महाप्रसाद व गोपाळ काला आयोजित केला आहे. आमला विश्वेश्वर नाट्यवेडे गाव म्हणून परिसरात प्रसिध्द आहे. या यात्रेनिमित्त  गावचे उत्साही नाट्य मंडळ स्वतः बसविलेल्या नाटकाचे प्रयोग सादर करतात. श्रीकृष्ण नाट्य मंडळ, आमला विश्वेश्वर च्या वतीने ३१ जानेवारीला रात्री ७ वा.’ डिटेक्टीव्ह चंगू मंगू ‘ तर संगम नाट्य व क्रीडा मंडळ, आमला विश्वेश्वर यांच्या वतीने ‘ ही बायको कोणाची ‘ या दोन अंकी नाटकाचे प्रयोग सादर होणार आहे.तर १ फेब्रुवारीला श्रीकृष्ण नाट्य मंडळ, आमला विश्वेश्वर यांच्या वतीने अभिरूची कला व क्रीडा मंडळ, अमरावती प्रस्तृत ‘ खेळ ‘ दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. यात्रेसाठी आमला विश्वेश्वर येथून लग्न होऊन सासरी गेलेल्या सर्व विवाहीत मुली माहेरी आल्या आहेत.यात्रेसाठी प्रत्येकांनी घराची साफसफाई व रंगरंगोटी केली असुन आमल्यातील प्रत्येक घर नातेवाईकांनी तुडूंब भरले आहे.