मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी फक्त 4 रुपये मोजावे लागणार

0
1155
Google search engine
Google search engine
मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी)च्या दरात जवळजवळ 79 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे नंबर पोर्टेबिलिटीसाठी फक्त 4 रुपये मोजावे लागणार आहेत.
ट्रायने दूरसंचार कंपन्यांना स्पष्ट शब्दात आदेश दिले आहेत की, प्रत्येक पोर्टिंगसाठी 19 रुपयांऐवजी चार रुपये आकारले जावेत. टेलिकॉम उद्योगातील भागधारकांशी सल्ला-मसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचंही ट्रायनं यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, ट्रायने एमएनपी शुल्क कमी करण्याची प्रकिया डिसेंबरपासूनच सुरु केली होती. त्यानंतर काल (बुधवार) या निर्णयाची माहिती देण्यात आली. त्यामुळे यापुढे पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना फक्त 4 रुपये मोजावे लागणार आहेत.