परिधी ठरली 2017-18 ची उत्कृष्ट विधर्थिनी

0
619

 

26 जानेवारी ला झाला सत्कार

चांदुर बाजार :-

69 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्थानिक चांदुर बाजार प्रल्हादपुर येथील ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम येथे गौरव महोत्सव 2017-18 चे आयोजन करण्यात आले.यावेळी वर्षभरात शाळेत उत्कृष्ट कामगिरी करणारे विधार्थी यांचा सत्कार मान्यवर यांचे हस्ते करण्यात आला.
प्रल्हादपुर येथील विधर्थिनी परिधी प्रदीप निचत केजी 2 मध्ये शिकत होती.शालेय जीवनात आणि वर्गात प्रथम आल्या बद्दल तिचा सत्कार शाळेचे पदाधिकारी पंडितराव मोहोड यांनी केला.तसेच पुढील वाटचालीस तिला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी परिधी चे आई वडील या सत्कार च्या कार्यक्रमला उपस्थित होते.