अमरावती येथे होणाऱ्या विशाल हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला जोरदार सुरूवात

0
567
Google search engine
Google search engine

 

अमरावती – हिंदु जनजागृती समिती आयोजित विशाल हिंदु धर्मजागृती सभा अमरावती शहरात येत्या ११ फेब्रुवारी यादिवशी सायंकाळी ५ वाजता संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदान, गाडगेनगर, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेच्या प्रसाराचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. यामध्ये सभेच्या विषयाचे होर्डिंग, विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन, उद्घोषणेद्वारे प्रसार, घरोघरी पत्रक देऊन प्रसार, शहरातील प्रतिष्ठीत, मान्यवर लोकांना भेटी देऊन निमंत्रण देणे तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात प्रसाराला वेग आला आहे. समितीचे कार्यकर्ते व शहरातील धर्माभिमानी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देश्याने असणाऱ्या या सभेच्या कार्यात आपले पद, पक्ष, संघटना विसरून एकत्रीतपणे कार्य करत आहेत.

 

या हिंदु धर्मजागृती सभेच्या उद्देश्याविषयी विस्तृत जाणून घेणे व कार्यात सहभागी होण्याची इच्छा असलेल्यांनी समितीला ८००७६३०९१३ य़ा क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.