घाटलड़की / चांदूर बाजार –
गुप्तबातमी दाराकडून मिळालेल्या माहितीवरुन देवीनगर घाटलड़की रोडवर स्थानिक पोलिसांकडून नाकाबंदी केली असता टायर ट्यूब मधून 60 लीटर गावठी दारू व एक मोटरसाइकिल असा एकूण 25000 /- रु चा माल जप्त करुण आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.
आरोपी – कैलाश मनोहर पंडौल वय 21 वर्ष राहनार नळा.आठनेर,म प्र याचे ताब्यातून सदर माल जप्त करण्यात आला आहे तसेच आरोपी – 1) दामू लालचंद धाडसे वय 19 वर्ष
2) नितीन बिरजू बारस्कर वय 33 वर्ष दोन्ही रा मानी, आठनेर म प्र यांचा कडून
60 लीटर गावठी दारू व एक मोटरसाइकिल , असा एकूण 23000 /- रु चा माल जप्त करुण आरोपी अटक करण्यात आली दोन्ही गुह्यात एकूण 48,000 रु चा माल जप्त करण्यात आला सदरची कारवाई स.पो.नि श्री सचिन तायवड़े सहित पो हवा रविन्द्र शिंपी, ना.पो.का सचिन भुजाडे, ना.पो.का त्रंबक सोलंके, पो.का महेंद्र राऊत यांनी केली आहे.