*बि.एस.एन.एल ची सेवा ठप्प अनेक सेवा प्रभावित-दूरध्वनी देयके भरण्याची अपुरी सोय ग्राहकांना आर्थिक भुर्दड व मनस्ताप*

0
905
Google search engine
Google search engine

अचलपूर: / श्री प्रमोद नैकेले –

 

BSNL ची गेल्या कित्येक दिवसांपासून सेवा ठप्प झाली आहे.बि.एस.एन.एल इंटरनेट सेवेची कनेक्टीव्हीटी होत नसल्याने अनेक सेवा प्रभावित झाल्या आहेत.
देश डिजीटलायझेशन कडे वाटचाल करित आहे त्यामुळे जवळपास सर्व कामे आँनलाईन झालेली आहेत व जवळपास शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच बँक,शाळा व इतर ठिकाणी इंटरनेट चा उपयोग होतो तेथे बि.एस.एन.एल.चे कनेक्शन वापरल्या जातात. गेल्या काही दिवसांपासून हि सेवा खंडीत व नादुरूस्त असल्याने या सर्व ठिकाणचे आँनलाईन कार्य ठप्प झाले आहे किंवा त्या कामाकरीता विलंब होत आहे.शालेय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फार्म सेवा सुध्दा विस्कळीत झाली आहे.काही परिक्षांचे व स्पर्धा परीक्षेचे प्रवेश पत्र आँनलाईन काढावे लागतात ते सुध्दा खोळंबून पडले आहेत यामुळे अनेक लोकांना मानसिक,शारिरीक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.बँक,पोस्ट सेवा यामुळे प्रभावित झाली असून अनेक कामे ठप्प झाली आहे.याकडे भारत संचार निगम ने त्वरित लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहे.तसेच अचलपूर शहरात दूरध्वनी ची देयके केवळ पोस्ट मध्ये घेतली जातात त्यांचे कडील इंटरनेट सेवा चालत नसल्याने ते हि देयके स्वीकृत करीत नाही त्यामुळे ग्राहकांना या महिन्यात जादा भुर्दड पडण्याची शक्यता आहे तरी तांत्रिक अडचणी मुळे ग्राहकांना जादा भुर्दड न देता नियमित देयके भारत संचार निगमने स्विकारून ही देयके भरण्याची पोस्ट सोबतच इतर व्यवस्था करावी अशी ही जनतेची मागणी आहे.