*आय.टी.आय च्या ऑनलाईन परीक्षा रद्द करा – शिवसेना युवासेने चा उपसहसंचालक श्री देवतळे यांना घेराव*

0
768

अमरावती:-

 

दि.०५/०२/२०१८ पासून ITI च्या परीक्षेची सुरुवात होणार असून त्यातील काही trade व्यावसायिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने दि.१७/०२/२०१८ घेण्याचा घाट मा.प्रभारी संचालकांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या संचालयना कडून मांडला आहे. असा निर्णय किती कल्पक बुद्धीचा वापर करून घेण्यात आला यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. ITI च्या काही trade च्या प्रात्यक्षिक व सैद्धांतिक परीक्षा व त्याचे गुण मूल्यमापन हे ऑनलाइन परीक्षा घेऊन एक शब्दांत किंवा एका वाक्यात उत्तरे देऊन केल्या जाऊ शकत नाही. पण ते केल्या जाऊ शकते हे जावईशोधच मुळी या संचालनालय कार्यालयाने लावला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
ITI मध्ये शिकणारे ८०% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून ते १० वि उत्तीर्ण होईपर्यंत त्यांना ऑनलाइन परीक्षेची कुठलीच जाण नसते.आपण जारी त्यांना प्रशिक्षण दिले तरी ते त्यांना कितपत उमजेल हे सर्वस्वी त्या विद्यार्थ्यांना आकलन शक्ती वरच अवलंबून आहे आणि त्या विद्यार्थ्यांना ती पद्धत इतक्या सहजा सहजी येईल असे वाटत नाही. कारण प्रत्यक्षात एखाद्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना त्या विद्यार्थ्याला जी कसब,मेहनत लागते व लिहिलेल्या उत्तरा मुळे त्याला तो विषय कितपत समजला हे कळते.

तेच केवळ एका शब्दात वा टिक करून ते उत्तर सोडवावे लागले तर तो विद्यार्थी त्या विषयाचा कितपत अभ्यास करेल व त्यात पारंगत होईल हा केवळ हा मुद्दा आहे. म्हणून ही ऑनलाइन परीक्षा ताबडतोब रद्द करून पूर्वीची साधी सरळ व सोईस्कर पद्धतीने च परीक्षा घेण्यात यावी ही मागणी आज आशिष ठाकरे (शिवसेना उपशहर प्रमुख अमरावती शहर) यांच्या नेतृत्वात करण्यात आली.प्रसंगी प्रणय डांगे (युवासेना उपशहर प्रमुख अम.)भूषण भिसे,गौरव गतफने, संकेत गढवाल,श्याम भनक, शिवम बेले,शुभम जवंजाळ शिवसैनिक तथा विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.