संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सव उत्साहात साजरा – भव्यदिव्य श्रीं ची पालखी >< महिला,पुरुष भंजन,दिंडीचा सहभाग

0
1459
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )                

       चांदूर रेल्वे शहरातील संताबाई यादव नगरातील मंदिरात मोठ्या उत्साहात संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संत गजानन महाराज मंदिर कमेटी तर्फे सोमवारी सकाळी काकडा आरती,तिर्थस्थापना,अभिषेक,पांच कुडीय महायज्ञ,गायञी परीवार,अमरावती तर दुपारी गजानन महाराज महिला भजन मडळींच्या वतीने भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर मंगळवारी श्रीं चे अभिषेक,आरती व 10 वाजता श्रीं ची भव्यदिव्य पालखी मिरवणुक शोभायाञा शहरातील मुख्य मार्गाने तालुक्यातील विविध गावातील आंमञित भंजन मंडळी,महिला भजन मंडळांच्या सहकार्य काढण्यात आली. यावेळी संत गजानन माऊलींच्या युवा भक्तांनी पारंपरिक भूमिकेत फेटा बांधून श्रीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

भव्य दिव्य शोभायाञेत मोठ्या संख्येने शहरातील महिलांनी आपला सहभाग दर्शविला. श्रीच्या पालखीचे शहरात अनेकांनी पुजन करून फुलाने स्वागत केले. यानंतर बुधवारला सकाळी काकडा आरती,श्रींचा महारूद्राभिषेक,श्रींची महाआरती व ह.भ.प.अक्षय महाराज हरणे,आमला विश्वेश्वर यांचे काल्याचे किर्तन,हरिपाठ तर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील हजारो नागरीकानी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या तिन दिवसांच्या कार्यक्रमात संताबाई यादव नगराला याञेचे स्वरूप आले होते. या प्रगटदिन महोत्सवाला तन मन धनाने मंदिर कमेटीचे सुरेश तिखे, मारोतराव भोले, लक्ष्मण दर्येकर, नगरसेवक वैभव गायकवाड, प्रफुल्ल कोकाटे, सचिन चंदाराणा, तुषार वानखडे, सुनिल खेरडे, विक्की कविटकर, प्रशिल लेंडे, बाळु टावरी, ञिशुल सराड, सारंग देशमुख,विजय वानखडे, अशोक मसतकर, ढगे गुरूजी व शहरातील गजानन महाराज भक्तानी स्वंयस्फूर्तीने उपस्थिती राहून सहकार्य केले.