शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कठिबद्ध-: तहसिलदार शरद झाडके

0
1056
Google search engine
Google search engine

 

परळी वैजनाथ (दीपक गित्ते) ः- राज्यशासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्व जनतेला मिळावा, सर्व सामान्यांची कामे तात्काळ करुन देण्याचा सुचना तहसिल प्रशासनातील सर्व कर्मचार्‍यांना दिल्याची माहिती परळीचे तहसिलदार शरद झाडके यांनी दिली.
आज शनिवार,दि.१० फेबु्रवारी रोजी परळीचे कर्तव्यदक्ष तहसिलदार शरद झाडके यांचा तहसिल कार्यालयात
तहसीलदार शरद झाडके यांनी विकसित केलेल्या नवीन लिंकची मा जिल्हाधिकारी साहेबानी दखल घेऊन पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवल्याबाबत त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी तहसिलदार शरद झाडके यांचा पत्रकार नितीन ढाकणे, दिपक गित्ते,महादेव गित्ते, बालाजी ढगे यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , व पुष्पगुच्छ, देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान तहसिलचे पुरवठा अधिकारी श्री बालाजी कचरे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व कर्मचारी तलाठी, गिरधावर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना तहसिलदार शरद झाडके म्हणाले की, राज्यशासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्व सामान्य जनतेला मिळावा, तहसिल कार्यालयातील जनतेची कामे तात्काळ व्हावीत यासाठी आपण लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन मनाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन मुंडे यांनी केले.