सिरोंचा :- तेलंगणा सरकारकडून भूपालपल्ली बस आगाराकडुन गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा टोकं असलेल्या सिरोंचा येथून तेलांगणाचे राजधानीअसलेल्या हैद्राबाद पर्यंत सिरोंचा ते हैद्राबाद या बसफेरीची शुभारंभ तेलंगणातील मंथानींचे आमदार पुट्टा मधुकर यांच्या हस्ते शहरातील बसस्थानाका समोरील इंदिरा चौकात करण्यात आलं.
सिरोंचा नगरपंचायत कडून या बस शुभारंभ निमित्य छोटेखानी समारंभाचे आयोजन येथील इंदिरा चौकात करण्यात आलं होते.सिरोंचा हैद्राबाद बस फेरी सुरु केल्याबद्दल नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी आमदार व बसआगर प्रमुखाच शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला समारंभाला शहरातील मान्यवर उपस्तित होते. या बस सेवेमुळे येथील व्यापारी वर्गाला फायदा होणार आहे.