श्री. छत्रपती शिवाजी शाळेत सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न

0
603
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान .) 
स्थानिक न. प. व्दारा संचालित श्री. छत्रपती शिवाजी शाळा येथे सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच थाटात संपन्न झाला.
    या सास्कृतिक कार्यक्रमामध्ये बुधवार (ता. ७)ला रांगोळी स्पर्धा, गुरूवारी कबड्डी, लंगडी, खो-खो खेळांचे आयोजन, शुक्रवारी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संपुर्ण कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी स्नहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
      या सर्व कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती सौ. स्वाती माकोडे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुने म्हणुन न. प. उपाध्यक्ष देवानंद खुणे, बांधकाम सभापती सौ. कल्पना लांजेवार, पाणी पूरवठा सभापती वैभव गायकवाड, सौ.दीपाली मिसाळ आदींची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमात नगरसेवक संजय मोटवानी व वैभव गायकवाड यांनी पाणी बचाव या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन रंजना दांडेकर  यांनी तर प्रस्ताविक प्रा. नितीन नंदनवार व आभार तृप्ती डवरे यांनी केले. यावेळी शिक्षक विकास बडवाईक, पद्मा सोनवने, सूशिला मनोहर यांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.