आकोटमध्ये पुस्तके वाटप करत रयतेच्या राजाला मानाचा मुजरा शिवजयंती निमित्य तरुणांचा कौतुकास्पद उपक्रम

0
645
Google search engine
Google search engine

आकोटः (संतोष विणके )

 

शालेय पाठ्यपुस्तका बाहेरील व पराक्रमा पलीकडील शिवराय विध्यार्थ्यांना कळावे या उद्देशाने अकोट शहरातील विविध शाळेत पुस्तक वाटप करुन रयतेचे जाणते राजे छञपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्य दि.20 मंगळवारला हा अनोखा उपक्रम शहरातील विविध शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.यामध्ये न.पा. शाळा क्र.५,शाळा क्र६ शाळा क्र ७ सह जि.प.दगडी शाळा आदी ठीकाणी विद्यार्थ्यांना छञपती शिवाजी महाराजांसह ईतर महापुरुषांवरील पुस्तके मोफत वितरीत करण्यात आली.यावेळी नगरसेवक मंगेश चिखले, नगरसेवक मानिष कराळे, मनोज झाडे ,समाजसेवक विजय ढेपे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर, प्रतिक गोरे, गणेश चंडालिया,विश्वजीत सुपासे,वानखडे ,रंधे मॕडम मुख्याध्यापक पिंजरकर व सर्व शिक्षकगण यांच्या हस्ते विविध शाळेत पुस्तके वाटप करण्यात आली.या अनोख्या उपक्रमाचा समारोप जि.प. दगडी शाळा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी छगनरावजी इंगळे यांच्या हस्ते पुस्तके वाटप करुन करण्यात आला.यावेळी प्रकाश गायकी यांनी मुलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निमकर्डे मॕडम यांनी केले.

या उपक्रमासाठी निखील पिंपळे, रोहित शेगोकार, अक्षय चोरे, अभिलाष काळमेघ, रोषण मेतकर, प्रशांत बन्नाडे, विपुल गुलाये, केशव हेंद, मंगेश मोरे, स्मित पवार ,वैभव डांगरे, रितेश गोरडे यांचेसह महात्मा जोतीबा फुले जयंती उत्सव समीतीचे मोलाचे सहकार्य लाभले, छञपती शिवाजी महाराजांना केलेल्या या अनोख्या मानवंदनेचे शहरात अनेकांनी कौतुक केले.