चिमुकले व महिलांनी साजरी केली शिवाजी महाराज जयंती – रेल्वे स्टेशन परीसरात केले आयोजन

0
821
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान  )
      हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सगळीकडे साजरी होत असतांना स्थानिक रेल्वे स्टेशन परीसरात चिमुकल्यांनी व महिलांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
      सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून हारार्पण करण्यात आले व उपस्थितांनी अभिवादन केले. यानंतर रेल्वे स्टेशन परीसरातील स्नेहल डोंगरे, राधा चौरागडे, काजल राऊत, मयुरी चौरागडे, महेश चौरागडे या चिमुकल्यांनी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा मांडली. सदर कार्यक्रमाचे आयोजन सागर गरुड, कल्पना लांजेवार यांनी केले होते.  यावेळी परीसरातील महिलावर्ग, चिमुकले मोठ्या संख्येने उपस्थित होते.