खा. श्री तडस यांनी श्रेय घेऊ नये – जि. प. अध्यक्ष गोंडाणे >< चांदूर येथील रेल्वे थांबा प्रकरण

0
723
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे / शहेजाद खान-

 

अनेक निवेदने….मोठे जनआंदोलन….रेल्वे प्रशासनाला बेशरमचे झाड भेट….नागपुर मध्य रेल्वे कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा…. रेल रोको कृती समितीच्या या सर्व प्रकारानंतर अखेर रेल्वे प्रशासन नमले. सर्व तांत्रीक बाबी दुर करून अमरावती- अजनी इंटरसिटी एक्सप्रेस व अमरावती – जबलपुर एक्सप्रेसचे चाके २६ फेब्रुवारीपासुन चांदुर रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे. याबाबतचे पत्र मंगळवारी (ता. २०) रेल रोको कृती समितीचे नितीन गवळी यांना ऑनलाईन प्रणालीव्दारे मिळाले आहे. यामुळे तालुक्यात सगळीकडे आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.    यावेळी

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री नितीन गोंडाणे म्हणाले कि  चांदुर रेल्वे शहराला मिळालेल्या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या थांब्याचे श्रेय खासदार रामदास तडस यांनी घेऊ नये. सदर श्रेयही स्थानिक चांदुरवासी यांचेच आहे. वेळोवेळी निवेदने दिली, आंदोलने उभारली त्याचंच हे फलित आहे. या थांब्यामुळे चांदूर रेल्वे, तिवसा व नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील लोकांना प्रवासासाठी सोयीचे होईल असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाने यांनी केले.