वाठोडा शुक्लेश्वर – खोलापूर मार्गावर अवैध देशी दारु जप्त – होळी आणि रंगपंचमी निमित्त ठिकठिकाणी कारवाई

0
685
Google search engine
Google search engine

ठाणेदार सतीश चवरे यांची कारवाई

प्रतिनिधी :- गजानन खोपे

वाठोडा शुक्लेश्वर :-खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथुन अवैध देशी दारु येत असल्याची गोपनीय माहिती खोलापूर पोलीसांना मिळाली त्या माहिती च्या आधारे आरोपीचा पाटलाग करून अवैध देशीदारू पोलिसांनी जप्त केल्याची घटना 2मार्च रोजी दुपारी 3.३०वाजताच्या सुमारास घडली,अजीत खाँ,नजाकत खाँ वय २८वय रा.खोलापुर असे आरोपीचे नाव आहे, आरोपीच्या ताब्यातून 120 देशी दारू च्या पावट्या एक बाईक एकुण 30हजार रूपयांचा मुद्दलमाल जप्त केला, तसेच वाठोडा शुक्लेश्वर येथुन नावेड येथे अवैध देशी दारु येत असल्याची गोपनीय माहिती खोलापूर पोलीसांना मिळाली त्या माहिती च्या आधारे आरोपीचा पाटलाग करून अवैध देशीदारू पोलिसांनी जप्त केल्याची घटना 2 मार्च रोजी रात्री 7 . वाजताच्या सुमारास अवैध देशी दारू पकडली,
संजय धंदर वय ३४असे अटक केलेल्या आरोपी चे नाव आहे,
आरोपीच्या ताब्यातून ४८देशी दारू च्या पावट्या एक बाईक एकुण ३० हजार रूपयांचा मुद्दलमाल जप्त केला,तसेच
दारापूर येथे अवैध देशी दारू विक्ररी चालू असल्याची गोपनीय माहिती खोलापूर पोलीसांना मिळाली त्या माहिती च्या आधारे आरोपीच्या घराहत्या घरातून देशी दारु जप्त केली, सुनील गवई वय ३२ असे आरोपीचे नाव आहे, आरोपीच्या ताब्यातून १५ नग देशी दारू च्या पावट्या एकुण २५००रूपयांचा मुद्दलमाल जप्त केला,
ठाणेदार सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात , दुय्यमठाणेदार विनोद जांभळे,पी.एस.आय.खंडारे, पोलीस, कॉ शुभम शर्मा , मनोज सावरकर प्रभाकर हभरडे, पुढील तपास करीत आहे,