Jamiat Ulama -i- Maharashtra मराठा व धनगर समाजाच्याच नाही तर कुठल्याही घटकाचा आरक्षणाचा विरोधी नाही >< लोकमत १८ वाहिनी वरील बातमी साफ खोटी - मौलाना नदीम सिद्दीक्की

0
1140

लोकमत १८ वाहिनी वर खटला दाखल करणार – मौलाना नदीम सिद्दीक्की Jamiat Ulama -i- Maharashtra

मुंबई :- महाराष्ट्र सरकार तर्फे मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणा विरोधात सोशल मिडीयावर वायरल होत असलेली विडीओ क्लिप खोटी व निराधार असल्याचे Jamiat Ulama -i- Maharashtra यांनी खंडन केले आहे. Jamiat Ulama -i- Maharashtra मराठा व धनगर समाजाच्याच नाही तर कुठल्याही घटकाचा आरक्षणाचा विरोधी नसल्याचे स्पष्ट केले आहे Jamiat Ulama ने नेहमी आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मुस्लीम तसेच इतर समाजाचा घटकांसाठी आरक्षणाची मागणी केलेली आहे त्यासाठी धरणे आंदोलन करून सरकार वर दबाव टाकण्याचे काम केल्याचे Jamiat Ulama -i- Maharashtra चे अध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीक्की यांनी एका प्रकाशित केलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे.

लोकमत १८ वाहिनी वरील बातमी साफ खोटी असून चुकीची बातमी पसरवली जात आहे Jamiat Ulama -i- Maharashtra सदर बातमीचा जाहीर निषेध करीत असून संबंधित वाहिनी विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे मौलाना नदीम सिद्दीक्की यांनी म्हटले आहे.