संत तुकोबाचे चरित्र अलौकिक आहे! -ज्ञानेश प्रसाद पाटील <> ग्यानबा तुकाराम जयघोषाने दुमदुमली संतवाडी

0
913
Google search engine
Google search engine

आकोट (संतोष विणके )

येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र कालवाडी ला संत तुकाराम बीज सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. बीजेला गावोगावचे भक्तगणांनी संत दर्शनार्थ गर्दी केली होती

गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांचे प्रेरणा व वै पंजाबराव हिंगणकर यांचे पुढाकाराने तुकाराम महाराजाचे पहीले मंदिर म्हणून या क्षेत्राला वारकरी भाविकांत अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.येथे गत ३६ वर्षापासून येथे बीजेचा सोहळा संपन्न होत आहे.
बीजे निमित्त गावोगावचे भाविक मोठ्या श्रद्धेने आपला माथा तुकोबाचे चरणी टेकवून धन्य होतात.

संत तुकाराम मंदीरात फाल्गुन वद्य बीजेला पहाटे या भक्ती सोहळ्याचा प्रारंभ झाला.संताभिषेक व महापुजा ह.भ.प.सुधाकरराव हिंगणकर ,नंदकिशोर हिंगणकर ,अनंत महाराज यांचे हस्ते सपत्निक पार पडली पुजेचे पौरोहित्य ह.भ.प. मोहन महाराज रेळे यांनी केले.
तद्नंतर संत पालखी सोहळ्यात गावोगावच्या दिंड्यांसहभागी झाल्यात.टाळ मृदंगाचे स्वरात अभंग गायन, पावल्या फुगड्या खेळत भक्ती रंगात अख्ख कालवाडी ग्राम न्हाऊन गेले.पुंडलिका वरदे…,ग्यानबा तुकाराम, ॐ वासुदेव नमो नमः चे गजराने सारा आसमंत दुमदूमन गेला होता”या सोहळ्याचे अवघी अवतरली पंढरी .आळंदी .देहू” असेच वर्णन करावे लागेल
त्यानंतर ह.भ.प.ज्ञानेशप्रसाद पाटील यांचे काल्याजे किर्तन पार पडले महाप्रसादाने या बीज उत्सवाची पुर्णाहूती झाली..उपस्थित भाविकांनी महाप्रसादाला लाभ घेतला

दरम्यान २४ फेब्रुवारी ते ३मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह पार पडला.गाथा पारायणात भाविक श्रद्धेने सहभागी झाले होते. प्रवचन किर्तन मालेत नामवंत महाराज मंडळींनी हजेरी लावून सेवा देत समाजप्रबोधन केले

सप्ताहाच्या आयोजनात ह भ प मोहन महाराज रेळे,विष्णू महाराज गावंडे,राधेश्याम महाराज,कन्हैया महाराज, साठे महाराज यांनी महत्वाचे योगदान दिले तर जळगांव नहाटे,नेव्होरी,सावरगांव,खापरवाडी ,वणी वारुळा येथील टाळकरी मंडळींनी विशेष सहकार्य केले.
या निमित्ताने या छोट्याशा गांवात श्रद्धा भक्ती ज्ञानाचा अपूर्व संगमाने वातावरण फुलून गेले होते.तरुणांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेवून नवचैतन्य निर्माण केले.

संत तुकोबाचे चरित्र अलौकिक आहे!
-ज्ञानेश प्रसाद पाटील

संत तुकाराम महाराज वारक-याचे श्रद्धास्थान आहेत.त्याचे जीवन चरित्र अलौकिक आहे.अभंग गाथेतून त्यांनी ब्रम्हांडाचं ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचविले.भक्ती ज्ञानाचा मार्ग सर्वासाठी खुला करुन जनकल्याण केले. धन्य तुकोबा समर्थ…म्हणूच ते वारक-यांसाठी सर्वोश्रेष्ठ म्हणून प्रिय थोर आहेत.भक्ती ज्ञान वैराग्याचे मुर्तिमंत संत होत असे भावोद्गार ह .भ.प.ज्ञानेश प्रसाद पाटील यांनी काढले.ते काल्याचे किर्तन करतांना बोलत होते

*गोकुळीच्या सुखा। अंत पार नाही लेखा।*

या अभंगातून भगवंत लिला चरित्र व वैकुंठगमनाचे अभंगातून तुकोबाचे चरित्र वर्णन केले.तसेच वै. पंजाबराव हिंगणकर यांचे कार्यस्मृतींना उजाळा देत अभिवादन केले

याप्रसंगी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा भक्ती सोहळा यशस्वी करण्यासाठी युवक मंडळीने अथक परिश्रम घेतले. सोहळ्यासाठी विशेष सहकार्य करणारे महाराज तथा देणगीदार,विणेकरी,अन्नदाते यांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला
कार्यक्रमाचे संचालन सचिन हिंगणकर यांनी केले.मंडळाचे वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.